श्री साई विद्यालयात माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन शिबिर संपन्न


आज दि.२०/१/२०२४ रोजी मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अंतर्गत श्री साई विद्यालय मानखुर्द मध्ये माजी विधार्थी मार्गदर्शन शिबिर ९ वी व १० वी साठी आयोजित करण्यात आले होते .
   मार्गदर्शन शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेचा माजी विधार्थी महाराष्ट्र  पोलिस सेवेमध्ये हेड काँस्टेबल( क्राइम ब्रांच नवी मुंबई )म्हणून कार्यरत असलेला श्री.लक्ष्मण सोनुरे व दुसरी विधार्थिनी सीए म्हणून प्रैक्टिस करणारी कु.शितल बोटे व संदीप भंडारे उपस्थित होते.
सर्वप्रथम श्री .जाधव सर यांनी सर्व विद्यार्थाना या तीन माजी विद्यार्थांची ओळख करुन दिली यामध्ये त्यानी या विधार्थानी प्रतिकूल परिस्त्यितीमध्ये कसे यश मिळवले ते सांगितले.व त्यांचे शाळेकडून मनपूर्वक स्वागत केले.
श्री.चव्हाण सर यांनी हे मार्गदर्शन शिबिर का आयोजित केले व मुलांनी या मार्गदर्शन शिबीरामधून काय घेतले पाहिजे व ते दैनदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर करुन कसे यश मिळवले पाहिजे हे सविस्तरपणे सांगितले.
लक्ष्मण सोनुरे याने अतिशय मार्मिक भाषेमध्ये मोबाईल चे फायदे व दुष्परिणाम सांगितले. मोबाईलची सेक्युरिटी हैक झाल्यावर  ,फ़ोन चोरी झाल्यावर,सोशल मीडिया जसे फेसबुक ,इन्स्टाग्राम,व्हॉट्सअप हैक करुन ब्लैकमेल केल्यावर काय केले पाहिजे किवा हे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे अगदी उदाहरणासहित स्पशिटीकरण करुन माहिती दिली.तसेच मुलांनी संगत कशी ठेवावी व व्यसनापासून कसे दूर राहिले पाहिजे हे समजावून सांगितले.
शितल बोटे हिने विद्यार्थांनी परीक्षेचा काळात कसा अभ्यास करायचा व कसे नियोजन करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली .अभ्यास करत असताना एखादा घटक किवा गणितातील सूत्रे अभ्यास करताना पाटातर न करता समजून घेऊन अभ्यास कसा केला पाहिजे व परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे कसे गेले पाहिजे हे समजावून सांगितले.
संदीप भंडारे याने अपयश आल्यावर खचून न जाता  पुन्हा आत्मविश्वासाने आयुषामध्ये कसे पुढे गेले पाहिजे याविषयी उदाहरणे देऊन सांगितले.
श्री .गायकवाड सर व कदम सर यांनी आभार मानून विद्यार्थांनी यांच्यासारखे यश मिळवावे असे सांगितले .
या कार्यक्रमास राऊत मॅडम,पाटील सर ,अस्मिता पाटील मॅडम उपस्थित होते.

Comments