श्री साई विद्यालयात विद्यार्थ्यांना स्व संरक्षणाचे धडे


आज दि.२०/१/२०२४ रोजी मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा  व आर.एस.पी . मुंबई अंतर्गत संरक्षणशास्त्र विषयांत श्री साई विद्यालयात इ. ९ वी च्या विद्यार्थाना आर.एस. पी. शिक्षक श्री.संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विग्नेश कांबळे ,हेमावती पाठक व श्रावणी चव्हाण यांनी स्व संरक्षणासाठी स्वतःचा कसा बचाव करायचा याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविली व विद्यार्थाकडून करुन घेतली. जाधव सर यांनी आग लागल्यानंतर,भूकंप आल्यानंतर किंवा अचानक दंगल जाळपोळ इत्यादी आपत्ती मध्ये आपला कसा बचाव करायचा व इतराना कसे वाचवावे याचे उदहारणासहित समजावून सांगितले.
श्री चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना कराठे मधील विविध प्रात्याशिकाची माहिती व मार्गदर्शन केले व या उपक्रमाचे कौतुक केले.
              शेवटी जाधव सर यांनी विग्नेश ,हेमावती,श्रावणी या विद्धार्थाचे विशेष कौतुक करुन सर्वांचे आभार मानले.


 

Comments