श्री साई विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 *आज श्री साई विद्यालयात “शिक्षक दिन” उत्साहात साजरा*

आज दि.५ सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करत असताना दहावीच्या विद्यार्थ्यांनी जाधव सर व राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हेमावती पाठक व साक्षी गोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक बनून  इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला त्यानंतर सृष्टी वाक्षे व श्रावणी चव्हाण यांच्या सूत्रसंचालनाखाली शिक्षक दिन समारंभ पार पडला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन का साजरा करावा? एक दिवसाचा शिक्षक झाल्यावर काय अनुभव आले याचे मनोगतातुन व्यक्त केले. श्रावणी चव्हाण, रचना साळुंखे व हेमावती पाठक यांची मनोगते अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासयुक्त व्यक्त केली. त्यानंतर कदम सर यांनी शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करायचा याची सखोल माहिती दिली. राजकर सर यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले .ठाकरे सर यांनी मुलांना शिस्त का पाळायची यावर मार्गदर्शन केले जाधव सर यांनी शिक्षकांचे पिढी घडवण्यात असलेल्या सिंहाचा वाटा यावर व भविष्यात विद्यार्थ्यांनी पिढी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. गायकवाड सर यांनी 2G,3G,4G गेले पण गुरुजी कधी संपणार नाही असे मनोगतातून व्यक्त केले .शेवटी चव्हाण सर अध्यक्षीय भाषणात त्यानी मुला-मुली मधील शिक्षणातील असमतोलपणा यावर उहापोह केला. 

यावेळी राऊत मॅडम, भुवड सर,भामरे मॅडम रूपाली पाटील मॅडम ,हरपले सर,सांगळे मॅडम पाटील मॅडम ,बेर्डे मॅडम,कोळेकर मॅडम,महेश चव्हाण सर, सावंत मावशी, मंगेश गोसावी सर ,राकेश यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. 

श्रावणी चव्हाण व सृष्टी वाक्षे यांनी उल्लेखनीय सूत्रसंचालन करत कार्यक्रम यशस्वी केला .

शेवटी सर्वांच्या आभार मानून सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


































































Comments