"महापूर व दुष्काळ"-सांगलीत निसर्गाचा चमत्कार

"***हे टाळण्यासाठी हे कराच मुख्यमंत्री साहेब ****
पुरस्थितीवर नियंत्रणासाठी टेंभु, म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागातील तलाव, नाले योजना कार्यान्वित करुन भरुन घ्यावेत. दुष्काळी भागास पाणी सोडावे.

कृष्णा नदिची पातळी ५० फुटावर गेली. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(४५ फुटावर धोकादायक) बर्‍याच भागात पाणी आले आहे. तेथील रहिवासी यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरु आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास अधिक धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे मार्ग बंद केले आहेत.
नदिकाठच्या सार्‍याच गावांची स्थिती चिंताजनक आहे.

हे सारे टाळणे शासन-प्रशासनास सहज शक्य आहे. राजकारणी यांची  तशी मानसिकता हवी....


जत,कवठेमहंकाळ, आटपाडी, खानापूर, सांगोला, सातार्‍यातील माण-खटाव, मिरज पुर्व भाग या तालुक्यांत पाऊन अत्यल्प पडतो.

आज लाखो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ते आलमट्टी धरणामार्गे समुद्रास मिळते. ते वाया जाणारे पाणी टेंभु, म्हैसाळ, ताकारी योजनांतून दुष्काळी भागास पावसाळ्यातच सोडावे. तेथील पाठबंधारे, तलाव भरुन घ्यावे. अगदी ओढ्यांतून सोडल्यास शेतकरी ओढ्यालगतच्या विहीरी भरुन घेतील.

१)त्यामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती नियंत्रण आणता येईल.
२)वाहून जाणारे पाणी वाया जाणार नाही.
३)प्रशासनास आपत्कालीन व्यवस्थापनासाठी लागणारी धावपळ/कसरत करावी लागणार नाही. कुटुंबे स्थलांतरीत करावे लागणार नाही.
४)पूरपिडितांना सुरक्षित ठिकाणी  हलवावे लागते. ते लागणार नाही.
५) बाजारपेठांत/घरांत पाणी शिरल्याने होणारे नुकसान टळणार.

राजकारण्यांनी प्रामाणिक प्रयास करुन, टेंभु, ताकारी योजना त्वरित सुरु करण्यासाठी पाठपुरावा करावा.

खर्च येणार आहे तो फक्त लाईट बिलाचा.
इकडे हजारो कोटी दुष्काळ वेळी खर्च केला जातो. पण सोप्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

सांगली जिल्ह्यातील सर्व पुढार्‍यांना विनंती आपण प्रशासनास विनंती करुन दोन दिवसात या योजनांतून जत, कवठेमहंकाळ, आटपाडी, खानापूर, मिरज पुर्व भाग, सांगोला भागाला पाणी आताच देण्यासाठी प्रयास करावा.

Comments