पानिपत प्रतिशोध - दिल्लीवर भगवा
-------------------------------------------------
१४ जानेवरी १७६१ रोजी पानिपतचा रणसंग्राम मराठे आणि अब्दाली यांच्यामधे झाला. या युद्धामुळे मराठयांनी आपले सर्वस्व गमावले असाच आजपर्यंत समज करून देण्यात आला आहे. पण सत्य परिस्थिती पूर्णपणे वेगळीच आहे याउलट मराठ्यांनी हे युद्ध हरून देखील आपले सर्वस्व न गमावता पुनप्रस्थापित काही दिवसातच केले असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. युद्ध झाल्यानंतरच पुन्हा हिंदुस्थानची सूत्रे आपल्याकडे देणाऱ्या व्यक्तीचे नाव होते ' अहमदशाह अब्दाली ' पानिपतचे युद्ध जिंकणारा. कोण विजेता असे पाऊल उचलतो ? पराजेत्याकडे सर्व देऊन टाकतो. ऐकले आहे इतिहासात असे कधी ? पण हे सत्य आहे. मराठ्यांच्या शौर्याची प्रचिती आल्यानंतरच अब्दालीचा पक्का विश्वास बसला होता ह्या हिंदुस्थानचे रक्षण फक्त मराठेच करू शकतात. या संबंधीचे पत्र अब्दालीने नानासाहे पेशव्यास गुलराज नावाच्या वकीलाकरवी पाठवले या पत्रात अब्दाली म्हणतो - " तुमचे आमचे वैर असण्याचे कारण नाही,तुमचा पुत्र विश्वासराव आणि बंधू सदाशिवराव भाऊसाहेब युद्धात मारले गेले त्यास आमचा नाईलाज होता. भाऊसाहेब युद्धात उभे राहिले असता आम्हांसही बचावासाठी लढणे प्राप्त होते. दिल्लीचा कारभार आता आपण पूर्वव्रत चालवावा,त्यास आमची काही हरकत नाही.शाह आलमास गादीवर बसवावे. झाल्या गोष्टी विसरून जावे आणि आपला स्नेह कायम राहावा अशी मनापासून इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी " हा उल्लेख वाचून कोण म्हणेल मराठ्यांचा पराभव झाला ? निदान पुढे कोणी असे म्हणल्यास त्यास हा पत्रातील उल्लेख दाखवावा.
पानिपतच्या युद्धानंतर पुढील १० वर्षातच माधवराव पेशव्यांनी मराठ्यांचे वर्चस्व पुनप्रस्थापित केले. विस्कटलेली घडी पुन्हा माधवरावांनी पूर्वव्रत केली होती. याच सर्वांची व्यवस्था सुरु असताना माधवराव पेशव्यांचे अकस्मात निधन झाले. यानंतर उत्तरेतील बराचसा कारभार हा महादजी शिंदे यांच्या अधिकारा खालीच सुरु होता. याच दरम्यान गुलाम कादर ची नेमणूक हि मीरबक्षी आणि मुख्यात्यार पदावर केली जाते. हा गुलाम कादर म्हणजे नाजीबखान रोहिल्याचा नातू,झाबेताखान याचा मुलगा याच्या आजोबा प्रमाणे हा देखील तितकाच पाताळयंत्री.बाकी जास्त खोलात न जाता गुलाम कादरच्या कर्माकडे वळूयात. दगाबाजी करण्यात या रोहिल्यांचा हात कोणी धरणार नाही. दिल्लीच्या बादशाह विरोधात सूड उगवणारी हकीकत तर मन सुन्न करणारी आहे. गुलाम कादर बादशाह जवळ आला त्याने आपला हात बादशहाच्या गळ्यात घातला,तंबाखूचा धूर त्याच्या तोंडावर सोडला, त्यानंतर बादशाहला विचारले पैसा,जडजवाहीर कुठे आहेत? यावर चिडून बादशहाने उत्तर दिले जे काही होते ते मी दिलेच आहे आता मी काय माझ्या पोटात तर लपवून ठेवणार नाही ना? यावर गुलाम कादर ने उत्तर दिले,काय सांगावे मला तुझे पोट चिरून पहावे लागेल. पुढे गुलाम कादर बादशहाच्या छातीवर बसला कट्यारीने बादशहाचे डोळे काढले या प्रसंगाची आठवण म्हणून एका चित्रकाराला बोलावून चित्र काढले. यानंतर बादशहाला अन्न पाण्याविनाच तळपत्या उन्हात अपमानित अवस्थेत उभे केले.दरबारातील स्त्रियांना अमानुष अश्या गलिच्छ यातनांना सामोरे जावे लागले. एक बेगम तर हाय खाऊन मेली, अजून दोन बेगमा अन्न पाणी न मिळाल्यामुळे मेल्या त्यांचे प्रेत पुरण्यास देखील गुलाम कादर ने परवानगी दिली नाही.त्यांची मृत शरीरे ३ दिवस तशीच कुजत पडली होती.स्त्रियांवर केलेले अत्याचार तर इथे शब्दात देखील सांगू शकत नाही.या सर्व अत्याचारात गुलाम कादरचे मन हे दगडाचे होते की काय अशी दाट शंका येते. अमानुष पणाचा परमोच्च कळस म्हणजे गुलाम कादर.
आता वेळ होती मराठयांची. मराठे हळू हळू अंतर्वेदीतून दिल्लीकडे सरकत होते.यावेळी गुलाम कादर ची रसद मराठ्यांनी तोडली त्याला पळून जायला मराठ्यांनी भाग पाडले दरबारातील ज्या काही स्त्रिया त्याने कैद केल्या होत्या त्यांना मराठ्यांनी सोडवले,त्यांना अन्न वस्त्र देण्याची व्यवस्था केली.मराठ्यांकडून यावेळी राणाखान हा प्रतिनिधी म्हणून होता. दिल्लीतील व्यवस्था मार्गी लावून मराठयांनी आपला मोर्चा पुन्हा गुलाम कादर कडे वळवला.दिल्लीच्या किल्ल्यातून पळून गेल्यावर गुलाम कादर यमुनेच्या तीरावर आला. ज्या बाजूला गुलाम कादरचे सैन्य होते त्या बाजूच्या खालील अंगाने दूर जाऊन मराठयांनी आपले सैन्य घुसवले. आता मराठे आणि गुलाम कादर यांच्यामधे छोट्या मोठ्या चकमकी सारख्या होत होत्या याची परिणीती स्वरूप मराठे एक एक पाऊल पुढे गुलाम कादरच्या दिशेने सरकत होते. यातून सुटका करून घेण्यासाठी गुलाम कादर ने मीरतच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.मराठे हात धुवून गुलाम कादर चा पाठलाग करत होते,बातमी मिळताच मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. गुलाम कादरचे दैव बलवत्तर होते त्याची मदत करण्यासाठी मनियारसिंग कुमक घेऊन आला. याच संधीचा फायदा घेऊन गुलाम कादर ने मिरतेचा किल्ला सोडला यावेळी त्याच्यासोबत फक्त ५००स्वार होते. मराठ्यांना कादरचा हा मनसुबा कळताच एक तूकडी त्याचा पाठलाग करण्यासाठी गेली. त्या अंधाऱ्या रात्रीत गुलाम कादर आणि त्याच्या माणसांची चुकामुक झाली. रात्रीच्या अंधारात वाट मिळेल तिथे तो पळत होता.मराठे आपला पाठलाग करत आहेत हे कळताच तो एका खड्यात लपून बसला.थोडी उसंत घेऊन पुन्हा पाळायला लागला पहाट होई पर्यंत शामली नजीकच्या बामणोली नावाच्या एका खेड्यात येऊन गुलाम कादर पोचला. एका आश्रितकडे त्याने आश्रय घेतला.काही करून त्याला घोसगडावर पोहचायचे होते पण अडसर होता तो मराठ्यांचा. पण मराठ्यांना बातमी मिळालीच तडक मराठयानी छापा घालून गुलाम कादर ला कैद केले.
गुलाम कादर ची रवानगी मराठ्यांनी महादजी शिंद्यानकडे मथुरेला केली. डिसेंबर अखेरीस कैदी मथुरेस पोचले. गुलाम कादर ने लपवलेली संपत्ती कुठे ठेवली आहे हे महादजीने चतुराईने विचारले पण हा रोहिला बधला नाही. कादरच्या कैदेची माहिती मिळताच बादशहाने महादजीस पत्र पाठवले त्यात बादशाह म्हणतो - "पैशाच्या लोभाने आमचा छळ करणार्याची गय केली जाणार असेल तर आपण सर्व सोडून मक्केस निघून जातो" या पत्राची दाखल घेत गुलाम कादरला यमसदनी पाठवण्यात आले.
या सर्वात गुलाम कादर चा मृत्यू कशा प्रकारे झाला हे प्रत्येक मराठ्याने जाणूनच घेतले पाहिजे. - जसे बादशाहचे डोळे काढले त्याच प्रमाणे गुलाम कादरचे देखील डोळे काढण्यात आले. त्याचे प्रेत हे झाडाला पाय वर बांधून मानेकडील भाग खाली ( त्याच्या धडाला मान नव्हती बर का ) अश्या अवस्थेत लटकवण्यात आले. त्या प्रेताच्या जवळ एक काळ्या रंगाचा श्वान (कुत्रा) होता त्याच्या मानेतून ठिपकणारे रक्ताचे थेंब चाटत बसायचा, पुढचे दोन दिवस तो कुत्रा ह्या मेजवानीचा लाभ घेत होता. मराठयांनी कादरच्या वाट्याला अंत्यसंसकर देखील येऊ दिला नाही.
याची फलश्रुती म्हणूनच दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचे मानचिन्ह असलेला भगवा झेंडा फडकत होता तो देखील पुढची 15 वर्षे. पण हा इतिहास आजच्या पिढीला माहितीच नाही हे आमचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण आम्हाला दिसते ते फक्त युद्धात जिंकणे आणि हरणे,जाती-जातीत द्वेष करणे हेच आजपर्यंत मागच्या पिढीला सांगण्यात आले आहे.
जी व्यक्ती पानिपत चे युद्ध घडवून आणण्यास कारणीभूत होती तो नजीबखान रोहिल्या च्या वंशाचा अंत असा करून मराठ्यांनी त्यांच्या उरत धगधगणारा प्रतिशोध घेतला होता. नाजीबखानाने पानिपत चे कृत्य केले नसते तर मराठा साम्राज्याची एवढी मोठी हानी झाली नसती. पण इतिहासात जर तर ला जागा नसते.गुलाम कादर च्या अंतानेच पानिपतावर वीरगती प्राप्त झालेल्या प्रत्येक विराच्या आत्म्यास शांती मिळाली असेल.
संजय जाधव (सर)

Comments
Post a Comment