वाढदिवस आमच्या नेत्याचा........अनिलभाऊ बाबर

।। टेम्भू योजनेचे जनक,जलसम्राट,आधुनिक भगीरथ, आटपाडी खानापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर ....आपल्या  भाऊंचा वाढदिवस , दुष्काळग्रस्तांचा कैवारी आणि समाजकारणातला देव माणूस म्हणजे भाऊ...
भाऊंची सर्वसामान्य जनतेशी असणारी बांधीलकी संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहीत आहे , त्याबद्दल मी वेळोवेळी लिहिलेले आहे म्हणून आज भाऊंच्या वैचारिक राजकारणाबद्दल थोडेशे...

सांगली जिल्ह्यात  विशेषतः सध्याच्या राजकारणात  विचार आणि तत्वांचा अभाव जाणवत रहातो पण अशावेळी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या राजकारणाचा बाज लक्षात येतो , वैचारिक बांधीलकीतून लोकांशी जोडलेली नाळ कायम ठेवणे आणि  सामाजिक जबाबदारीची वाट चालने या सर्व बाजूंवर लक्ष ठेवत पुढे जाण्याची भूमिका सातत्याने घेणे आजच्या घडीला सहजशक्य नाही  परंतु भाऊंनी आपल्या 45 वर्षांच्या राजकीय व सामाजिक  कारकिर्दीत ही भूमिका कणखर पणे बजावली आहे ,
          वयाच्या 21 व्या वर्षांपासून आजअखेर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवत सहकारासह विविध क्षेत्रात   भाऊंनी त्यांचा वेगळा दबदबा कायम ठेवला , लोकांमध्ये राहून समाजाला वैचारिक दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न पहिला म्हणजे राजकारणातीळ असा  " माणूस "  भेटणे विरळाच ,
     जय - पराजयाच्या हिंदोळ्यावरही नफ्या - तोट्याचा विचार न करता  कणखर पणे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची त्यांची जिगर  लोकांच्या मनात ठसते .
              राज्यपातळीवरिल अनेक प्रमुख नेत्यांशी भाऊंचे घनिष्ठ संबंध होते आणि आहेत पण भाऊ कधीच कोणाच्या मर्जीने वागले नाहीत ,  सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची बांधिलकी यामुळे भाऊंनी आपला बाणा कधिच सोडलेला नाही ,
प्रामाणिक आणि स्पष्टवक्तेपणा हा भाऊंचा गुणधर्म , एखादी गोष्ट त्यांच्याकडून होत नसेल तर कार्यकर्त्याला स्पष्टपणे तसे सांगणार पण कधी कोणाला झुलवत ठेवणार नाहीत , जे खरे असेल ते तोंडावर सांगणार .भाऊंचा नेमका हाच स्वभाव लोकांना आवडतो ,

सध्या मतदारसंघात अनेकजण भाऊंच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्यावर टिका करत आहेत पण भाऊंनी कधीही पातळी सोडून त्यांच्यावर टीका केली नाही तो त्यांचा स्वभाव नाही ,
                  कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण माझ्या माहिती प्रमाणे एकसारखी राजकीय महत्वकांक्षा असणारे दोन लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते दोघेही कमी असतात म्हणूनच एकत्र येतात , इथे तर भाऊंच्या विरोधात तीन पक्षांचे लोक एकत्र येण्याची भाषा करत आहे यावरून आपणच ओळखा " कौन कितना पाणीने है " .

भाऊंचा एक स्वभाव मला इथे नमूद करावा वाटतो तो म्हणजे  चिवट राजकारणी  !
 कोणी कितीही विरोध केला टीका केली , अडवणूक केली तरी भाऊंनी एकदा ठरवले की ते करतातच ,  उदाहरण घ्यायचे झाले तर टेंभूचे घ्या , सत्तेत नसताना सुद्धा सतत पाठपुरावा करून आठवड्यातुन एकदा तरी भाऊ मंत्रालयात जात होते , अनेकवेळा स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन आंदोलने केली , टेंभु योजनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली , एखाद्या उपसा सिंचन योजनेवर याचिका  दाखल होण्याचा हा देशातील पहिलाच प्रकार होता ,
                     
 अनेक विरोधक सतत म्हणत होते
पाणी माहुली ला येणार नाही - पाणी आले ,
आटपाडी ला येणार नाही - पाणी आले ,
गार्डी , घाणवड ला येणार नाही - पाणी आले ,
विट्याच्या तलावात येणार नाही - पाणी आले ,
पारे , चिंचणी ला येणार नाही - पाणी आले ,
आता भुड पासून पुढचे काम चालू झाले आहे लवकरच घाटमाथ्यावर पाणी जाईल पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देव तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि तुम्ही असेच पाणी येणार नाही  म्हणो आमचे भाऊ घाटमाथा भिजवायला तयारच आहेत .
     असो.......

भाऊ वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
तुम्ही पुन्हा आमदार होणारच ही टेंभुच्याच काळ्या दगडावरची रेघ आहे पण आता आमचे स्वप्न आहे ते तुम्हाला येत्या काही दिवसात नामदार करण्याचे !
          संजय किसन जाधव सर

Comments