शौर्य दिन ....पानिपतची लडाई.

*आजच्या दिवशी म्हणजे*
*१४ जानेवारी १७६१ रोजी पानीपतवर सव्वा लाख मराठे शौर्याने लढता लढता धारातीर्थी पडले.*
*कित्येक दिवस पोटात अन्न नाही. कडाक्याची थंडी पण अंगभर कपडे नाहीत.*

अशा भयानक परिस्थितीत मराठा वीरांनी सुर्य डोक्यावर येई पर्यंत पराक्रमाची शर्यत केली.
मराठ्यांचे शौर्य पाहून अब्दाली रणांगणातुन पळुन दुर डोंगरावर जाऊन उभा राहिला आणि तिथून आपल्या सैन्याला आदेश पाठवु लागला.
पण काही केल्या मराठ्यांच्या समोर अब्दालीच्या सैन्याचा निभाव लागेना.
शिंदे, होळकर, पवार, माने,गायकवाड हे शिलेदार मावळ्यांचा रणांगणावर उत्साह वाढवत होते. गगनभेदी रणगर्जणा होत होत्या हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या घोषणांनी आसमंत भरून गेला होता.
अब्दालीच्या तोंडच पाणी पळून गेल होत. साले यह #मरहट्टे किस मिट्टी के बने है नकळत अब्दाली पुटपुटला.
दुपार झाली सुर्य डोक्यावर आला. पोटात अन्नाचा कण नसलेल्या मावळ्यांना भोवळ येऊ लागली.
त्याही परिस्थितीत वीर लढत होते. पण आता जोर कमी होत चालला होता. काही वेळ मावळे लढत राहिले.
आता सुर्य पश्चिमेकडे सरकत होता. सुर्य प्रकाश मराठ्यांच्या चेहर्यावर पडत असल्यामुळे आणि पोटात अन्न नसल्यामुळे मराठे थकले होते. हे अब्दालीच्या लक्षात आले आणि अब्दालीने ताज्या दमाची राखीव फौज रणांगणात उतरविली.
युध्दाचे पारडे फिरले. दुपार पर्यंत विजयी असलेले #मराठे आता पराभुत होत होते. हातघाईची लढाई सुरू झाली. पुन्हा मराठे प्रचंड त्वेशाने लढु लागले. रणांगणावर रक्ता मासाचा चिखल झाला.
अब्दालिच्या राखीव फौजेन उपाशी आणि थकलेल्या मराठ्यांची कत्तल चालु केली.

अब्दाली,कुतुब आणि नजीबने तिन्ही बाजूंनी हल्ला चढवला...तानाजीराव खराडे हि बातमी घेऊन आला तसा तडक दत्ताजींनी निशाण फडकवण्याचे आदेश दिले आणि यशवंतराव जगदाळे,पिराजीराव जगदाळे,स्वतः अश्या तीन तुकड्या करत रणांगणात उडी घेतली...पण उशीर झाला होता रणांगणात फक्त अफगाणी दिसत होते आणि दिसत होता मराठांच्या मुडद्याचा खच...
पिराजी,यशवंतराव,दत्ताजी नाजिबाच्या सापळ्यात अडकले होते...गोळा लागून यशवंतराव खाली पडले त्याचे कलेवर आणायला गेलेले पिराजीराव बंदुकीच्या बारानी जखमी होऊन पडले...दोन्ही सरदार पडलेले पाहून अफगाण म्हणाले "मुरगी मारी बच्चे दानादान" (दोन्ही सरदार पडलेत आता मुरगी मारा म्हणजे दत्ताजीला मारा म्हणजे मराठे (बच्चे) पळून जातील )...
आपले दोन्ही सरदार पडलेले पाहून दत्ताजी आवेशाने अफगाण्यांवर चालून गेले...पण अचानक एक जम्बुऱ्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीस छेदून गेला तसे दत्ताजी कोसळले.कुतुबशाह आनंदाने चित्कारत दत्ताजींजवळ आला आणि म्हणाला
"क्यू पाटील...और लडोगे ???"

तितक्याच आवेशाने दत्ताजी म्हणाले "क्यू नही...बचेंगे तो और भी लडेंगे"

दत्ताजी मारले गेले...

*या युद्धात सव्वा लाख मावळे आणि अनेक वीर सरदार मारले गेले. महाराष्ट्रात असे एकही गाव नव्हते. कि ज्या गावात चुडा फुटला नाही.*

मराठ्यांच्या इतिहासातील हे सर्वात भयानक आणि नुकसान करणार युध्द झालं.
पण हे युध्द कोणासाठी आणि कशासाठी झालं हे आजही कळायला मार्ग नाही. कारण जिथे युध्द झालं त्या पानीपतचा आणि आपला काहीही संबंध नव्हता.......
निव्वळ पेशव्यांच्या हव्यासापोटी मराठ्यांच् कधीही न भरून येणार नुकसान झाल.

दरवर्षी 14 जानेवारीला कालाआम पानीपत येथे शौर्यदिन साजरा केला जातो. जमल तर एकदा जाऊन या...
तीळगुळ खाऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दया पण पानिपतच्या रणसंग्रामात आपल्या पूर्वजानी याच दिवशी फार मोठ बलिदान दिल याचा कदापि विसर पडू देऊ नका.

*मराठ्यांनी अब्दालीला दिल्लीच्या तख्तावर बसू दिले नाही हा आपला  विजय होता...*
पानिपतच्या रणभुमीवर हिंदुस्थान रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांना अभिवादन !

कमी कपडे जवळ असलेले तीळ खात हर हर महादेव महादेव ....जय भवानीची चा जय घोष करत आपले मराठा वीर या परकीय शत्रुवर तुतुन पडले ते फक्त देशा च्या स्वाभिमानासाठी कारण शत्रु दिल्ली लुटुन चालला होता.
ही लढाई आपण हरलो पण जो पराक्रम जो शौर्य आपल्या मराठा वीरांनी दाखवला ते पाहुन शत्रु इतका घाबरला की परत कधी आला नाही व अहमद शाह दुरानी मुगलाना दिल्ली सोपवुन अफ़ग़ानिस्तानला निघुन गेला.
महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील मराठा वीर आज कामी आला.ज्या मातीतल्या वीर पुत्रानी पराक्रम गाजवत देश स्वाभिमानासाठी मरण पत्करलं त्यांचा आज स्मृतीदिन. त्यांना साष्टांग नमन !
वीरगती प्राप्त झालेल्या आपला मराठी वीरांना मानाचा मुजरा....
*जय भवानी....जय जिजाऊ..जय शिवराय ...जय शंभुराजे*
*|| हर हर महादेव ||*

*राष्ट्रप्रथम🇮🇳🚩*
संजय जाधव सर

Comments