वेडात वीर दौडले सात....

#शिवदिनविशेष
****************
२५ फेब्रुवारी इ.स.१६७४
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण.
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा दिली आहे.

प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.

महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.

पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२५ फेब्रुवारी इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीमधल्या जवळ जवळ सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली.
आजच्या दिवशी इंग्रज अधिकारी "कर्नल डिफन" यांने चाकणचा "संग्रामदुर्ग" हा भुईकोट किल्ला उध्वस्त केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳ ।। #मावळा ।। ⛳⛳🚩
संजय जाधव
स्वराज प्रतिष्ठाण

Comments