जगत माता नारी... जागतिक महिला दिन.

आजचा दिवस...
ज्या आईने बोट धरून चालायला शिकवलं तिचा...

आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत भांडण करणाऱ्या बहिणिचा...

आजचा दिवस भुताच्या खोट्या गोष्टी सांगणाऱ्या आजीचा...

आजचा दिवस सात जन्म साथ देणाऱ्या पत्नीचा...
...
आजचा दिवस सावित्रीबाई फुले यांचा
आजचा दिवस रमाबाई रानडे यांचा
आजचा दिवस मदर तेरेसा यांचा
आजचा दिवस इंदिरा गांधी यांचा
आजचा दिवस सिंधुताई सपकाळ यांचा
आजचा दिवस लता मंगेशकर यांचा
आजचा दिवस सरोजिनी नायडू यांचा
आजचा दिवस माधुरी दिक्षित यांचा
आजचा दिवस कल्पना चावला यांचा
आजचा दिवस साईना नेहवाल यांचा
आजचा दिवस किरण बेदी यांचा
आजचा दिवस प्रतिभाताई पाटील यांचा
आजचा दिवस मेधा पाटकर यांचा

आजचा दिवस...
स्वराज्याच्या कर्त्या-करवित्या
"राजमाता जिजाऊ" यांचा...

जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्या...
😊😊😊😘😘😘👨‍👩‍👧महिला या शब्दाबरोबर प्रेम,वात्सल्य,स्नेह,ममता या भावना समोर येतात पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते कारण स्त्रीही अबला राहिलेली नाही ती सबलाही झालेली आहे.21 व्या शतकात स्त्रीने स्वतः ची शक्ती ओळखली आहे ती आपल्या अधिकारासाठी झगडणे शिकली आहे.स्त्री ही त्याग,नम्रता,श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे ती कोणत्याच बाबतीत कमी नाही.पारंपारीकरित्या पुरुषाची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.
  भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी,दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असे स्थान दिलेले आहे.
तसं पाहता समाजातील स्वतः न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही गेल्या शतकांत त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेल्या प्रगतीचा थोडक्यात प्रवास 1950 मध्ये प्रेम माथूर यांना भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान,1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पुरुष व महिला एकत्र खेळण्याची संधी,भारत देशाच्यापहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी,सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान,भारतीय पोलीस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला ,मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार, भारतीय सैन्यदलात महिला प्रवेश व आतातर पुरुषाच्या बरोबरीने अधिकारी पदावर दाखल,भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटील,गानसम्रा लता मंगेशकर याना भारतरत्न किताब व भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 % आरक्षण तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, तारा बाई शिंदे,सावित्रीबाई फुले यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर,सुनीता विल्यम्स,अंजु जॉर्ज,कल्पना चावला,सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कृतत्व गाजवत आहेत तसेच पोलीस ,लष्करी दल याबरोबर रिक्षा,ट्रक चालविणे,पेट्रोल भरण्याचे काम,बस कंडक्टर,पत्रकारिता,फायर ब्रिगेड हे क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.
शेवटी या ठिकाणी तिच्याविषयीची एका स्त्री कवीची काही ओळी
तू आई
तू ताई
तू आजी
तू बाईचं शेवटी
तू आहेस नारी
तू वारस नाही घराण्याचा
पण वारस तूच देशील घराण्याला
नाव मोठ राखण्यास कुळदीपक तूच देशील...
स्त्री जन्म घेतलास अन होळी जीवनाची केली..
पुराणातही स्त्री बस आगीत होरपळून गेली.. सीता...
अग्नी परीक्षेला उगीच का सामोरी गेली...
अन मंदोदरी तिचं काय... तिची तर रोजच होती उखळातली गती...
तोंड दाबून मूक पणाने झेलत राहिली सगळे अत्याचार रावणाचे
नावं किती सांगायचे...
तेव्हापासून आत्ताचे...
अहिल्या,सीता,द्रौपदी....
मीरा,राधा,रुक्मिणी... ते राणी झाशीची पण होती त्यांच्या सोबतीची
काय सांगू किती अन कसं सांगू
पुराणांत ले अन इतिहासातले सगळे सोडा...
वर्तमानही त्यात जोडा...
आताच तर भीषण चित्र आहे
महिला दिन साजरा करून त्यांचे एक दिवस
गोडवे गाऊन बस काय...
विचारा एकच क्षण...
आपुल्याच मनाला...
 आई...पायी स्वर्ग असतो तिच्या
तिचे अन्याय कुणाला सांगू
ताई,बाई, माई, कुणी कुणीच सुटले नाही...
पाहू काही उपयोग का लिहण्याचा पोथीचा
की वाचून केला कचरा नुसता
उद्याचे जैसे थे...
गरज थोडीशीच आहे
मानसिकता बदलण्याची
दृष्टी कोण मानवीय ठेवण्याची
तिला काही नको...
फक्त जगू द्या,फुलू द्या
कोवळ्या कळीला उमलू द्या
एक हात द्या प्रेमाची साथ द्या
विश्वास द्या
आश्वासन एक कटाक्ष द्या
बस.....!!!!
संजय जाधव सर ...स्वराज प्रतिष्ठाण

Comments