9आॅगस्ट* *क्रांतिदिन
देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे.इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचा शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली.8 ऑगस्ट 1942 रोजी भारताला स्वतंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते;मात्र ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले.त्यामुळे महात्मा गांधींजींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला 'भारत छोडो' असे नाव देण्यात आले.'करेंगे या मरेंगे' अशी या आंदोलनाची घोषणा होती.गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकवटला होता.या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले.त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट क्रांतिदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकवत या आंदोलनाला सुरुवात झाली होती त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे.भारतीयांनी पुकारलेला 1857 नंतरचा हा सर्वांत मोठा स्वातंत्र्यलढा होता. दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलन याचा प्रस्ताव संमत करण्यात आला.त्यानंतर इंग्रजांनी गांधीजींना पुण्यातील आगाखान तुरुंगात कैद केले. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली.त्यावेळी तरुण कार्यकर्ता अरुणा असिफ अली यांनी नऊ ऑगस्ट रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला;मात्र गांधीजींनी हे आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे असे आवाहन देशवासियांना केले.गांधीजींनी केलेली छोडो भारतची गर्जना आणि दिलेला 'करेंगे या मरेंगे' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशभर पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योत जणू पेटली.देशभरात ब्रिटीश सत्तेला हाकलवून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता.ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती.हे रोखायचे कसे? असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईतील बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला...आता प्रत्येकजणच पुढारी होईल.ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती.त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी,कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.बाकीच्यांना पुढे नेण्यात आले.सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच.गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू,पटेल,आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले.देशभर जागोजागी हरताळ,मिरवणुका,मोर्चे यांना ऊत आला.सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांचा लाठीहल्ला, गोळीबाराला,जुमानत नव्हते. पोलिसांचे खून,जाळपोळ, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते.सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती.सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर या आंदोलनामुळे ब्रिटिशांची उरलीसुरली ताकदही लोप पावली.त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले.भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून 9 ऑगस्ट हा 'क्रांतिदिन' साजरा केला जातो.या ऐतिहासिक गोष्टीला विनम्र अभिवादन व आमच्या शाळेतील मुलांना प्रत्येक्ष या ठिकाणी नेऊन त्याविषयी माहिती देण्यात येते9 ऑगस्ट 1942 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा.. विनम्र अभिवादन..जय हिंद...संकलन:- संजय जाधव सरभारत माता की जय...🙏

Comments
Post a Comment