शिक्षक दिन -काल, आज आणि उद्या ..यावर संजय जाधव सरांचा स्तंभलेख.

 

5 सप्टेंबर 2020 ऑनलाइन शिक्षक दिन 
5 सप्टेंबर 2019 चा शिक्षक दिन

नमस्कार,आजच्या या पवित्र व शुभदिनी आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो.आजचा शुभ दिवस आपणा सर्वाकरिताच अंत्यत महत्त्वाचा आहे कारण ज्यांनी आपणास जीवनभर अगदी भरभरून दिले,जीवनाला एक दिशा व ध्येय दिले,जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला आणि आज पर्यंत जे आपणांस अशा अमूल्य गोष्टी देतच आले आहेत अश्या आपल्या सर्व गुरुवर्याचा,आपल्या मार्गदर्शकांचा, आपल्या जीवनातील दीपस्तंभाचे पूजन करण्याचा आजचा दिवस.
विद्येविना मती गेली ।मतीविना नीति गेली ।।
नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले ।।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
म.जोतीराव फुले
विद्येच्या अथांग ज्ञानसागराची महती आपल्या शब्दांत बंदिस्त करणारे थोर विचारवंत,लेखक,समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य म.ज्योतिराव फुले व आद्यशिक्षका सावित्रीबाई फुले, परमपूज्य साने गुरुजी तसेच विशेष करून ज्यांच्या जन्मनिम्मिताने आजचा ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन अवघ्या भारतात उत्साहाने साजरा होतोय असे महान शिक्षक व शिक्षकांप्रती निस्सीम प्रेम हृदयी जपणारे भारताचे पहिले शिक्षक उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन.... या सर्व महान विभूतींना आदरपूर्वक वंदन करून आजच्या आपल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास एका छोट्याशा कवितेने सुरुवात करूया
रंगीबेरंगी मनामनानी 
अशी शाळा ही भरली
जणू शब्द फुलपाखरे
ही चोहिकडे उडाली
शब्द.. शब्द ...कविता झाल्या
अंक अंक...पाढे झाले
गुरुजनांच्या मायेने
हृदय ज्ञानमंदिर झाले 
अश्या या ज्ञानमंदिरात आपण परत एकत्र येण्यासाठी व आपली आत्मिक शक्ती वाढविण्यासाठी व आलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी "इतनी शक्ती हमे दे दाता" ही प्रार्थना आपण म्हणूया.
आता आपण डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी व कार्यासंबंधी माहिती विचारात घेऊया.
  सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुतनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातोडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.


दन करा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.

१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.


चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे. कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.




ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

शेवटी एकच म्हणावे वाटते की प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यात महान असतात परंतु काही लोक ह्याच तारखेला शिक्षक दिन साजरा करायला पाहिजे त्याच तारखेला करायला पाहिजे असे म्हणून शिक्षकासाठी असणारा हा दिवस पण बंद पाडण्याच्या तयारीत आहेत ,आपण मात्र सर्व व्यक्ती चा आदर राखून आपण आपले आई वडील,गुरुजन यांचा आदर केला पाहिजे.

।।माझ्या जडणघडणीत मला इथपर्यंत पोहचविणार्या सर्व गुरुजनांना दंडवत ।।

संकलन: - संजय जाधव सर

               स्वराज प्रतिष्ठाण

                9987359200

                9029959200


Comments

  1. शिक्षक दिन ऑनलाईन छान साजरा केला आपण.स्तंभ लेखन उत्तम आहे सर

    ReplyDelete

Post a Comment