भगवा स्लरी प्लांट -प्रगतशील डाळिंब बागायतदार मोहनराव जाधव यांचा यशस्वी प्रयोग,तालुक्यात कौतुकाचा वर्षाव.
🚩 *भगवा स्लरी प्लांट* 🚩
*नाव- मोहन रघुनाथ जाधव*
पत्ता- मु.पो.पिंपरी खुर्द (जाधव मळा), तालुका -आटपाडी ,जिल्हा सांगली , राज्य - महाराष्ट्र.
पिन - 415 301
पेशा - शेती / व्यवसाय
मो.नं - 9403046161
Whatsapp - 9960734683
🟢 *कल्पना कशी सुचली -*
पहिले आम्ही बागेला आठ दिवसातून स्लरी सोडायचो व दोन दोन माणसांना दिवसभरात 300 झाडांना पण स्लरी घालून होत नव्हती. व हाताचा व अंगाचा दोन दिवस वास जात नसे. माणसात काय कार्यक्रमाला गेले तरी माणसं आमच्याकडे बघत बसायचे, त्यातून विचार केला की आपल्याला स्लरी प्लांट बनवायचा आहे मग धडपड सुरू झाली.
🟢 *जुगाड बनविण्यासाठी धडपड आणि अडचणी -*
मार्केटमध्ये बरेचसे स्लरी प्लांट आहेत, परंतु त्याच्या प्राईस पण खुप आहेत. आणि ते प्लांट सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नसतात. एकदिवशी निवांत बसलेलो असताना मी मार्केटमध्ये असलेल्या पृथ्वीराज स्लरी प्लांट वाल्यांना फोन केला असता, त्यांनी मला एक हजार लिटर क्षमतेच्या स्लरी प्लांट ची किंमत 55 हजार रुपये सांगितली असता मी त्यांना पाच हजार रुपये कमी करा असे रिक्वेस्ट केली, परंतु त्यांनी त्यास नकार दिला मग नंतर मी असा विचार केला का आपणच नाही असले स्लरी प्लांन्ट बनवू शकत. थोडा विचार केला असता कल्पना सुचली व मी हा स्लरी प्लांट घरीच तयार केला व माझ्या भरपुर मित्रांना पण तयार करून दिला . त्यातून अतिशय उत्कृष्ट रित्या स्लरी मिळत आहे त्याचा मला व माझ्या मित्रांना भरपूर फायदा झाला
🟢 जुगाडाचे नाव -
*स्लरी प्लांट*
🟣 *जुगाडाचा वापर कसा केला-*
ज्यावेळी आम्हाला स्लरी डाळिंबांना सोडायचे आहे त्यावेळी आम्ही स्लरी प्लांटमध्ये चाळीस किलो शेण, पाच लिटर गोमूत्र, पाच किलो गुळ आणि पाच किलो बेसन आणि बांधा ची एक ओंजळ माती अशी स्लरी तयार करून व काही वेळा कडधान्याची स्लरी तयार करून डाळिंबाच्या स्टेज नुसार त्यात बदल करून आम्ही स्लरी तयार केली व ती पाचशे लिटर ड्रममध्ये घेऊन एच.टी.पी च्या मदतीने डाळिंबाच्या प्लॉटला सोडायला सुरुवात केली.
🟣 *साहित्य काय वापरले?*
1000 ली. ड्रम व तीन इंची फिल्टरची जाळी , दोन रेडूसर , तीन कॉक, त्यातील पाणी ढवळण्यासाठी स्टरर व इतर साहित्य
🟣 *जुगाड कसं बनवलं ?*
पहिल्यांदा मार्केटमधून एक हजार लिटरची पाण्याची टाकी साडेचार हजार रुपयाला आणली व त्याला वर आणि खाली होल मारून घेतले. त्यात व्यवस्थित रित्या स्कीन फिल्टर फिट करून घेतला , आणि काँक व इतर साहित्य व्यवस्थित फिट करून घेतले.
🟣 *जुगाडांसाठी आलेला खर्च*
आंदाजे - 7,000 - 9,000 रू.
🟣 *_फायदे -_*
🍅यामधून मिळणारी स्लरी अतिशय स्वच्छ मिळते .
🍓त्याच्यात जिवाणूंची संख्या भरपूर मिळते .
🌽कोणत्याही प्रकारे स्लरी करण्याचा त्रास नाही.
🍇फक्त क्वाँक सुरू करून दुसऱ्या ड्रममध्ये स्लरी घ्यायची व STP/Venture च्या साह्याने ती बागेला डायरेक्ट सोडायची.
🍋 त्यात काडी कचरा वगैरे काही येत नाही.
🍌ड्रीपर चोकप होण्याचे टेन्शन नाही .
🍑 स्लरी सोडताना आपल्या हाताचा वगैरे कुठेही त्याला स्पर्श होत नाही, त्यामुळे अंगाचा वास येण्याचा प्रॉब्लेम येत नाही.
🍍 अतिशय उत्कृष्ट स्लरी ह्या प्लांट मधून मिळते
🍊 मार्केटमधील इतर कंपनीच्या स्लरी प्लॅनच्या तुलनेत हा स्लरी प्लांट कमी खर्चामध्ये हा प्लॅन्ट तयार होतो.
🥦 डाळिंब, द्राक्षे, वेलवर्गीय वनस्पती, ढबु मिरची व इतर सर्व प्रकारच्या पिकांना अतिशय उत्कृष्ट प्रतीची स्लरी आपण आपल्या पिकांना देऊ शकतो.
🏀 *टीप* : आपल्याला स्लरी प्लांट हवा असल्यास आम्ही बनवून पण देतो.🏀
🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

Comments
Post a Comment