माणदेशाची जीववाहिनी म्हणून ओळखणारी व कायम दुष्काळी नदी म्हणून ओळख असणारी माणगंगा नदी या वर्षी काही शतकानंतर म्हणजेच शिवकाळामध्येअफजलखानाची स्वारी प्रतापगडकडे येत असताना मानगंगेला पूर आला म्हणून खानाच्या फौजानी नदीच्या काठी तळ ठोकला होता व त्याचा एक सरदार पुरात वाहून गेला होता त्यानंतर आता या 2020 विशेष वर्षात एका महिन्यात दोनदा दुथडी भरून वाहू लागली,यावेळी प्रथमच राज्यसरकार व लोकप्रतिनिधी यांनी राजकारण न करता सांगली,कोल्हापूरची पुराची स्थिती कमी करण्यासाठी टेम्भू च्या माध्यमातून पूर्ण आटपाडी मध्ये पाणी आले होते परंतु प्रथम कोरोना व नंतर पावसाने या दुष्काळी भागात हाहाकार माजवला आहे .पुढील काही वर्षे शेतकऱ्याची पाण्याची तहान भागली असली तरी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,बाजरी,डाळिंब,मका,कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .गेली सहा महिने कोरोनामुळे बाजारपेटा बंद व आता पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
जाधवमळा पिंपरी खुर्द ता.आटपाडी येथील बंधारा गेल्या 70 वर्षात प्रथमच overflow होऊन वाहत आहे.
संजय जाधव

Comments
Post a Comment