शाहू महाराज भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ
इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण
एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती
कोल्हापूर जिल्हा
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव
छत्रपती शाहू महाराज भोसले
जन्म:- जून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर
मृत्यू:- मे ६, इ.स. १९२२
मुंबई.

Comments
Post a Comment