*माणदेशी हिरा*.......अध्यक्ष मा.तानाजीराव पाटील.
महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो परंतु जिल्ह्यातील आटपाडी सारखा तालुका कायमच दुष्काळी म्हणून ओळखला जातो पण दुष्काळी ही ओळख पुसण्यासाठी एक उमदा तरुण आटपाडी च्या राजपटलावर केव्हा अवतरला व बघता बघता दुष्काळी वाटणारा तालुका डाळिंब,आंबे, व इतर धान्याचा कोठार बनला कळलाच नाही, काही लोकांनी जातीपातीचे राजकारण करून आमदारकी मिळविली पण या तरुणाने विकासाचे राजकारण करून जनतेत अध्यक्ष ही पदवी मिळविली जी आमदार, खासदारांपेक्षा निश्चित च मोठी आहे आज त्या अवलीयाचा म्हणजेच आटपाडी चा ढाण्या वाघ,युवकांचा बुलंद आवाज,गोरगरीब जनतेचा कैवारी, सामान्याचा आधारवड,तालुक्याच्या विकासाचे नेतृत्व अध्यक्ष मा. तानाजीराव पाटील यांचा आज वाढदिवस त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा ।।
आमच्या तालुक्याला आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर,लेखक शंकरराव खरात अश्या अनेक विचारवंत,साहित्यिकाची परंपरा लाभली आहे.आटपाडी दुष्काळी जरी असला तरी येथील लोक कष्टाळू आहेत त्यामुळे दुष्काळा मुळे मागे हटले नाहीत ते शिक्षण घेऊन नोकरी,शेती,गलाई व्यवसाय, यामध्ये कामे करून आपला उदरनिर्वाह करू लागले त्यामुळे आत्महत्या सारखे विचार माणदेशी माणसाला शिवत सुद्धा नाहीत.
आटपाडी च्या मातीत कुस्ती,कबडी,क्रिकेट या सारख्या खेळाच्या मातीत रमणारा एक सामान्य कुटुंबातील युवक तानाजी पाटील वरून अध्यक्ष तानाजीराव पाटील कधी झाले हे कळलेच नाही परंतु तानाजी वरून अध्यक्ष पणाचा प्रवास सहजासहजी झाला नाही त्यामागे प्रचंड मेहनत,जिद्द,आपल्या मातीविषयी असलेली तळमळ होती.रात्र असो, दिवस असो,ऊन, वारा, पाऊस हे काहीही न बघता अध्यक्ष क्षणात मदतीला येतात त्यावेळी तो कोणत्या गटा चा,पक्षाच्या, जातीचा वा विरोधी गटा चा हे ते बघत नाहीत.
मला तर वाटते आटपाडी च्या राजकारणाचा जाळ पोळ,मारामारी,जिरवा जिरवी, आडवा आडवी यावरून अध्यक्षानी तो विकासाकडे कधी नेहला हे कळलेच नाही.अध्यक्षाकड़े कधीही,कोणीही जावा ते मदतीला तत्पर असतात.
अध्यक्षांचे राजकारणातील सवंगडी,कार्यकर्ते हे पाच दहा वर्षांच्या मुलापासून ते 90 वर्षा च्या आजोबा पर्यंत आहेत यावरून त्यांच्यावर जनतेचे प्रेम दिसून येते.
आम्हाला नेहमी वाटायचे की अध्यक्षांनी "आमदार" व्हावे परंतु त्यांच्या कामांकडे पाहिल्यावर वाटते की जे काम आमदार,खासदार,मंत्री करणार नाहीत ते अध्यक्ष चुटकीसरशी करतात.आमच्या तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी असण्यास अध्यक्षांचे नेतृत्व कारणीभूत आहे कारण कोणत्याही गावात भावा-भावाची,गटातटाची,भावकीची,जातिपातीची भांडणे झाली की लोक पोलिस स्टेशन ऐवजी अध्यक्षा कडेच येतात कारण त्यांना वाटते की येतेच त्यांना न्याय मिळेल,अध्यक्ष पण लगेच रात्र ,दिवस न पाहता गोड बोलून किंवा प्रेमाने दरडावून सगळ्या मध्ये सलोखा निर्माण करतात.
अध्यक्षाच्या मनमिळाऊ व कार्य तत्परतेमुळे आटपाडी तील जवळजवळ सर्व लहान मोठया ग्रामपंचायती अध्यक्षा च्या कडे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मावळे संभाळत आहेत .ज्या ग्रामपंचायत मध्ये इतकी वर्षे प्रगती नव्हती ती अध्यक्षानी या दहा बारा वर्षांत करून दाखविली.
पाठीमागे मी एकदा त्यांना व आमदार अनिल भाऊंना "आधुनिक भगीरथ" म्हणालो होतो त्याचप्रमाणे अध्यक्षांनी टेम्भू योजनेचे पाणी भाऊ च्या मार्गदर्शनाखाली पुऱ्या तालुक्यात फिरवले आहे.त्यामुळे अनेक शेतकरी,कष्टकरी यांचे आशिर्वाद सैदव त्यांच्या पाठीशी आहेत .आम्ही अनेकवेळा टेम्भू च्या पाण्याबाबत अध्यक्षांना भेटल्यावर शेतकऱ्यांच्या विषयी, पाण्याविषयी त्यांची किती तळमळ आहे हे दिसून येते.
शिक्षणाचा प्रसार सर्व स्तरामध्ये होण्यासाठी अध्यक्षांनी शिक्षण संकुल उभे करून शिक्षणाची गंगा आटपाडी मध्ये आणली.तसेच आता अध्यक्षानी आमदार भाऊच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी चे आरोग्य केंद्र सुसज्ज होणार आहे तसेच आटपाडी,दिघेची,करगणी, शेटफळे, खरसुंडी येथे covid सेन्टर उभी केली आहेत .आता प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करावे व लोकांची गैरसोय टाळावी जे अनेक गावांमध्ये आपण उभे केले आहे.
आटपाडी तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी "शेतकरी शिबीर व मार्गदर्शन केंद" भरविण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत व मार्गदर्शन झाले.
अध्यक्ष जनतेसाठी तत्पर धावतात याची कित्येक उदाहरणे आहेत परंतु अध्यक्ष त्या गोष्टी चा कधी गवगवा करत नाहीत वा प्रसिद्धी मिळवत नाहीत.या महामारीच्या काळात गेली दीड वर्षे अध्यक्ष वेळ काळ न बघता सर्वांना मदत करत असतात,कोणाला बेड मिळाला का नाही,तब्बेत बरी आहे का नाही?त्याचबरोबर ही महामारी कमी करण्यासाठी त्यांची प्रत्येक गावच्या सरपंचाबरोबर,तहसीलदार,जिल्हाधिकारी, आमदार अनिलभाऊ यांच्याबरोबर दिवसातून अनेकवेळा चर्चा होत असते व जी आवश्यक मदत पाहिजे ती तत्पर पुरविली जाते.
आमदार,खासदार पेक्षा जनतेच्या मनातील अध्यक्ष तानाजीराव पाटील हेच सगळ्याना भावतात व जवळचे वाटतात कारण एक वेळ एका निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांचे एक वाक्य आठवते "यश येऊ दे की अपयश,
उतणार नाही,मातणार नाही,
घेतला वसा टाकणार नाही"
आणि दुसऱ्या दिवसापासून यांची जनतेची सेवा सुरू...
अश्या या महान विभूतीचा आज वाढदिवस असून अश्या नेत्याला हजारो वर्षे आयुष्य लाभो व त्यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढत जावो ही शिवचरणी प्रार्थना. 💐💐💐
शुभेछुक:- संजय किसन जाधव सर.
स्वराज प्रतिष्ठान, मुंबई.


Comments
Post a Comment