मराठी हृदय सम्राट श्री.राजसाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



 मा. राजसाहेब ठाकरे यांचा जन्म १४ जुन १९६८ साली मराठी कायस्थ कुटंबात झाला. त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे उत्तम संगीतकार व व्यंगचित्रकार होते. उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वर्गीय श्रीकांत ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू हॊते.

राजसाहेब ठाकरे यांच्या आई श्रीमती कुंदा ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी हॊत. राजसाहेब ठाकरे यांचा विवाह शर्मिला यांच्याशी झाला असून त्या सुप्रसिध्द नाटककार व चित्रपट निर्माते श्री. मॊहन वाघ यांच्या कन्या आहेत व राजसाहेबांना मुलगा अमित व मुलगी उर्वशी अशी दॊन अपत्ये आहेत.

मा. राजसाहेबांचे प्राथमिक शिक्षण दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झाले. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून फाईन आर्टचे धडे गिरवत असतांना पुढील शिक्षण अर्धवट सॊडून मा. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कचेरीत व्यंगचित्रकारीतेत व्यग्र झाले. व्यंगचित्रकारीतेची वडीलॊपार्जित देणगी त्यांना मिळूनही सध्याच्या अतिव्यस्त दिनक्रमामुळे तसेच पक्षीय जबाबदारीमुळे त्यांना व्यंगचित्रकारीतेकडे त्यांना शक्य हॊत नाही व ही खंत ते बरेच वेळा भर जाहिरसभेत बॊलून दाखवतात. कुणी विचारलं की तुम्ही राजकारणात गेला नसता तर तुम्हाला काय बनायला आवडलं असतं? तेव्हा राजसाहेब आवर्जून सांगतात की मला महाविद्यालयीन दिवसांत वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिऒत काम करायची मनिषा होती. चित्रपट निर्मिती करायलाही मला आवडलं असतं.

राजकीय कारर्कीद:

भविष्यातील नेता म्हणून मा. राजसाहेब ठाकरे यांनी राजकीय कारर्कीदीची सुरूवात मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिवसेना नेता म्हणून केली. भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांनी संघ्टनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न सोडवले. त्यामूळे सेनेची तरूण फौज त्यांचे नेर्तुत्व मान्य करू लागले. पण बाळासाहेबांवरील अतिव श्रध्दा असल्यामुळे कालांतराने सेनेत त्यांची घुसमट मुग गिळून सहन करत होते. शेवटी न राहुन त्यांनी शिवसेना नेते पदाचा तसेच शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौर करुन तमाम जनतेचे प्रश्न समजुन घेत ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मराठी व मराठी माणसाची होणारी गळचेपी, महाराष्ट्राच औद्योगिक विकास, खेड्यापाड्यातील तरूणांना रोजगार व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या़नी मनसेच्या सारखी संघटना स्थापना केली. शिवसेनेत असल्यापासून १४ जुन १९८६ साली त्यांनी स्थापन केलेल्या शिवउद्योग सेनेच्या माध्यमातुन असंख्य मराठी तरुणांना रोजगाराचे दालन उपलब्ध करुन दिले.

मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी राजसाहेबांचे हात बळकट झाले पाहीजेत व त्याचसाठी प्रत्येक मराठी माण्साने त्यांच्या पाठीशी ठामपणे ऊभे राहणे गरजेचे आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

संकलन: संजय जाधव (सर)

              स्वराज प्रतिष्ठान,मुंबई.



Comments