टेनिसची अनभिज्ञ सम्राज्ञी -स्टेफी ग्राफ .

 


💐💐💐


*स्टेफीची पन्नाशी!!!*

जन्म _(१५ जून १९६९)_

काही काही जागा अढळ आहेत! त्या जागेवर तीच माणसे शोभून दिसतात! किती आले आणि किती गेले, तरी मनातले काही कोपरे त्यांचेच राहतात! असाच एक कोपरा *स्टेफीसाठी!!!!*

टेनिस जगताचे एक सुंदर स्वप्न! १९८७ ते १९९९... ची राणी! २२ ग्रँड स्लॅम विजेती! एकाच वर्षात चार ग्रँड स्लॅम आणि अॉलम्पिक्स विजेतेपदाचा विक्रम पण!

त्यावेळी आपल्याजवळ अजून ब्लैक अँड व्हाईट टीवीच होता आमच्या घरी. कॉलेज मधे होतो मी... पण जबरदस्त फॅन! वेळ काढून, जमेल तसे... धडपडत... डीडी स्पोर्ट्स वर विम्बल्डन बघायला घरी येत होतो मी! तिचे खेळणे आवडायचे की दिसणं, हे कळायचं ते वय नव्हतं !! बस्स... आवडायची... अजूनही आवडते...!!

कुरळे केस, चेहऱ्यावर कायम मंद स्मित, गोरापान रंग, माधुरी स्टाइल हेअर कट... किंवा मग ती आकर्षक पोनीटेल, बांधलेले केस, गरूडाची चोच कशी असते  तसे... सरळ उभे धारदार नाक, सौम्य, नाजूक पण प्रचंड आकर्षक चेहरा...

जबरदस्त होते ते सगळेच !!!

पण हा नाजूक पणा कोर्टवर खेळताना मात्र कुठे जायचा माहीत नाही!!! कमालीचा जबरदस्त फोरहॅण्ड आणि प्रचंड चपळ वावर होता कोर्ट वर तिचा!!! बॅकहॅण्ड पण एकदम फ्लॅट...!! प्रतिस्पर्धी एकदम घायाळ!!!

चार ऑस्ट्रेलिअन ओपन,
सात विम्बल्डन,
सहा फ्रेंच ओपन आणि
पाच अमेरिकन ओपन!!

तिच्या नंतर असे सातत्य फक्त *सेरेना* कडे आहे!

रिटायर होऊन, आंद्रे अगासीशी लग्न करुन... संसार थाटला तिने...आणि बघता बघता आज तिला ४९ वर्षे पूर्ण झाली सुद्धा!!!

तिच्या आधी नी नंतर... किती आल्या... किती गेल्या... पण ती मनात तशीच राहिली!!!

अजुनही यु ट्यूब वर तिच्या जुन्या मॅच बघायला बसलो की  वीस बावीस वर्षे लहान होऊन जातो मी!

मार्टिना नवरातिलोवा, ख्रिस एवर्ट, अराँत्का साँझेस, मोनिका सेलेस, मार्टिना हिँगिस, मारिया शारापोवा, विल्यम्स भगिनी... कुणीही आठवून बघा... अगदी आताची नवीन फ्रेंच ओपन जिंकणारी... सिमोना...

कुणीही आठवा... *स्टेफी ती स्टेफी !!!*

अशा या टेनिसच्या राणीस... _(Queen Of Wimbeldon)_ तिच्या आजच्या खास सुवर्ण महोत्सवी वाढदिवशी... माझ्यासारख्या सर्व चाहते मंडळीकडून खूप साऱ्या शुभेच्छा !!!

*Happy Birthday Steffi Graf!!!*

        

💐💐💐 

Comments