थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना विनम्र अभिवादन


 *राष्ट्रीय गणित दिवस 2021*

 श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी कोइंबतूरच्या "इरोड"गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब कुंभकोनमध्ये गेले. जेथे त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.


सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांना वयाच्या तीन वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. त्यांना शाळा शिकवण्याची पद्धत बिलकूल आवडत नव्हती. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यात त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळाला.


रामानुजन यांना गणित हा विषय खूप आवडत होता. इतर विषयांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती त्यांना गमवावी लागली. तरी त्यांची गणित या विषयाची आवड काही कमी झाली नाही. 1911 मध्ये त्यांचा 'जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी मध्ये 17 पानाचा एक पेपर प्रकाशित झाला.


 1912 मध्ये रामानुजन यांनी 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' मध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना एक हुशार असे गणित तज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. त्याच वेळी रामानुजन यांना त्या काळातील जग प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ 'जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली.


हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.


रॉयल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे पहिले भारतीय ही ठरले रामानुजन ब्रिटनमध्ये असताना ब्रिटनचे थंड व ओलसर हवामान त्यांना मानवले नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खराब झाली आणि 1917 मध्ये त्यांना टीबी झाला.


TB या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 रोजी 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आजारपणात ही त्यांनी गणिताशी त्यांचे नाते तोडले नाही, ते पलंगावर पडल्या पडल्या प्रमेय लिहायचे. एवढे त्यांचे गणित या विषयावर प्रेम होते.


भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या र्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस "राष्ट्रीय गणित दिन" म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस "राष्ट्रीय गणित दिवस "म्हणून जाहीर केला आणि तेव्हापासूनच आपण "राष्ट्रीय गणित दिन" हा साजरा करीत आहोत.

श्री.संजय किसन जाधव सर


Comments