जागतिक मेंदूचा ट्युमर दिन

 

*आज*


*८ जून*


*जागतिक मेंदूचा ट्युमर दिन*


मानवी इंद्रिया मध्ये सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे 'मेंदू'. भूतलावरील सर्व सजिवा मध्ये मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. मानवी शरीर जितके सुदृढ़ आहे तितक्याच व्याधी देखील आहेत. मानवी मेंदू मध्ये ज्या गाठी निर्माण होतात त्यांना वैद्यकीय भाषेत ' ब्रेन ट्यूमर' म्हटलं जातं. आज जागतिक 'ब्रेन ट्यूमर दिना निमित्त' ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय याबद्दल डोंबिवली मधील एस.आर.व्ही. ममता रुग्णालयाच्या मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. कविता बऱ्हाटे यांनी मुंबई लाईव्ह ला दिलेल्या या खास मुलाखतीतुन जाणून घेऊया.


*ब्रेन ट्यूमर म्हणजे काय ?*


मेंदूमध्ये वेगवेगळ्या गाठी होतात. त्यांना ब्रेन ट्यूमर म्हणतात. हा ब्रेन ट्यूमर बेनाईन व मॅलीग्नंट अशा दोन प्रकारचे असू शकतात. बेनाईन ब्रेन ट्यूमरमध्ये धोका कमी असतो. मॅलीग्नंटला आपण बोली भाषेत कॅन्सर म्हणतो. यामध्ये वेगाने मेंदूतील गाठ वाढून अधिक समस्या निर्माण होतात. बेनाईन ट्यूमरची फार कमी गतीने वाढ होते. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारा काढता येते.


*ब्रेन ट्यूमर कसा होतो ?*


मेंदूतील कुठल्याही पेशीची अनावश्यक वाढ होऊन गाठ होऊ शकते. मेंदूमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. एक न्युरोन म्हणजे मज्जातंतू आणि दुसरी ग्लायल टिशू म्हणजे मेंदूचे बाह्य आवरण. यामध्ये मज्जातंतूपेक्षा मेंदूच्या बाह्य आवरणातून तयार होणारे ट्यूमर सामान्य असतात.


*ब्रेन ट्यूमरचा रुग्ण कसा ओळखावा ?*


तीव्र डोकेदुखी, खूप जास्त उलट्या होणे, अचानक तोल जाणे या बाह्य लक्षणांवरुन ब्रेन ट्यूमरची शंका येऊ शकते. अशावेळी डाँक्टारांकडून सल्लामसलत करून आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. बाह्य लक्षणांवरुन थोडी फार कल्पना येते. पण तो आजार सांगण्यासाठी मेंदूचे स्कॅनिंग करावेच लागते. स्कॅन केल्यानंतरच तो १०० टक्के अथवा कोणत्या प्रकारची गाठ आहे हे सांगणे शक्य होऊ शकते.


*रुग्णाची संख्या घटली की वाढली ?*


दरवर्षी ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांची संख्या ५ टक्के वाढत अाहे. नवनवीन स्कॅन उपलब्ध झाल्यामुळे ब्रेन ट्यूमरचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं ट्यूमरचे निदान लवकर होतं. वयोमान वाढल्यामुळं काही जणांमध्ये ट्यूमरचं प्रमाण वाढलेलं दिसतं.


*आवश्यक उपचार पध्दती* :


मेंदूतील गाठीचा गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रियाच केली जाते. ही गाठ कोणत्या स्थितीत व किती मोठी आहे याचं निदान झाल्यावर डाॅक्टर पुढील प्रक्रिया ठरवतात. ब्रेन ट्यूमर हा मेंदूच्या आत असेल तर ती ट्यूमरची गाठ छोटी असली तरी काढता येत नाही. तर हीच गाठ मेंदूच्या बाह्य आवरणात असेल तर काढली जाते.


*रेडिएशन थेरपी* :


मेंदूतील गाठ काढल्यानंतर परत ती तयार होऊ नये या साठी रेडिएशन थेरपी केली जाते. गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर काही भाग मेंदूत राहिल्यास रेडिएशन थेरपी देऊन त्या पेशींना निकामी केलं जातं. मेंदूच्या खूप आतमध्ये असलेल्या गाठीवर सर्जरी होत नसल्यामुळं त्यावर रेडिएशन थोरपी केली जाते. त्यामुळे ती गाठ हळूहळू कमी होत जाते.


*पथ्य काय पाळावे ?*


रेडिएशन थेरपी आणि किमो थेरपी करताना जे पथ्य सांगितले जाते ते पाळावेच लागतं.


*गर्भवती महिलांवर परिणाम* :


या महिलांवर कोणतीच शस्त्रक्रिया केली जात नाही. तसेच गरोदरपणात रेडिएशन थेरपीही दिली जात नाही. ट्यूमरची गाठ छोटी असल्यास त्यावर लक्ष ठेवलं जातं तसेच कोणतीही औषधे यावेळस दिली जात नाहीत. ज्यावेळी स्त्री बाळाला सुखरूप जन्म देते त्यानंतर ट्यूमरच्या गाठीवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

संकलन व संकल्पना

संजय जाधव

साभार

नेट

Comments