*२८ सप्टेंबर*
*जागतिक रेबीज दिन*
रेबीज बाधित प्राण्यांमुळे होणाऱ्या रेबीज आजारावर जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. २८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक रेबीज दिन' म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने रेबीज नियंत्रणाबाबत जागरूक होऊ या.
रेबीज हा ऱ्हायाबडोव्हायरस या कुटुंबातील विषाणू आहे. जंतुनाशकाला हा विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना रोगी जनावराची लाळ लागल्याने देखील होतो. रेबीज रोगाने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघुळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना या रोगाची लागण होऊ शकते. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगूस सुद्धा रेबीज रोग पसरवतात.
साभार
नेट

Comments
Post a Comment