आज २६ जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
दरवर्षी २६ जून हा दिवस 'जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन' म्हणून जगभर पाळला जातो. या निमित्ताने अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देवून लोकांना या पासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. अंमली पदार्थ म्हणजे फक्त गांजा, चरस, भांग, ताडी, हेरोईन, कोकेन, झोपेच्या गोळ्या, गुंगी आणणारी औषधे वगैरे असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र अंमली पदार्था मध्ये सर्व प्रकारची दारू, बियर, वाईन यांचा देखील समावेश असतो. जे जे पदार्थ सेवन केल्या नंतर मानवी मनोवस्थेत बदल करतात ते सर्व पदार्थ यात येतात. कोणाच्याही आग्रहाला बळी न पडता अशा सर्व मादक पदार्थां पासून स्वतःला दूर ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोचवा .


Comments
Post a Comment