श्री साई विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.

 भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.


रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

    यानिम्मित श्री साई विद्यालयात विद्यार्थांनी विविध प्रोजेक्ट तयार करुन राष्ट्रीय  विज्ञान दिन साजरा केला .












Comments