श्री साई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याचा शुभेच्छा दिन उत्साहात साजरा

 ✳️      श्री साई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याचा शुभेच्छा दिन उत्साहात साजरा ✳️


आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या *श्री साई विद्यालय मानखुर्द मुंबई  येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजेच शुभेच्छा दिन मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमास चव्हाण सर,राऊत मॅडम,गायकवाड सर,राजकर सर,पाटील सर ,भामरे मॅडम ,पाटील मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते तसेच *प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कवी,  शिक्षक, गीतकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मा. श्री संजय गवांदे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  पाहुण्यांचा परिचय श्री जाधव सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. श्रावणी चव्हाण व तेजस्विनी वाडकर यांनी केले. प्रमुख पाहुणेश्री. गवांदे सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. याबाबत अतिशय ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शिकविणाऱ्या शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली .त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ भामरे मॅडम,पाटील सर,कदम सर,गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री राजकर सर यांनी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने वागावे, काय करावे, काय करू नये.  याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चव्हाण सर यांनी देखील विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी व परीक्षेला कसे सामोरे जावे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अस्मिता पाटील मॅडम,सौ. कांबळे मॅडम, सौ. बेर्डे मॅडम,लिपिक महेश चव्हाण,किल्लेदार,देसाई,गोसावी  हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुष्प देऊन सत्कार केला. कु.तेजस्विनी वाडकर हिने सर्वांचे आभार व्यक्त केले व वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


*इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी मनःपूर्वक  शुभेच्छा!!!!*
























Comments