*सोमवार दिनांक ०६/०१/२०२५ रोजी श्री साई विद्यालय मानखुर्द येथे मुंबई येथील सुप्रसिद्ध डोळ्यांचे हॉस्पिटल "के. बी. हाजी बच्चूअली धर्मादाय डोळ्यांचे हॉस्पिटल" यांच्या मार्फत विद्यालयातील “मिशन रोशनी”अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत "डोळे तपासणी शिबिर" सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये इ.५वी ते १०वी च्या ३५० विद्यार्थाचे डोळे तपासणी करण्यात आली त्यामधील २६ मुलामुलींसाठी मोफत चष्मे देण्यात आले यावेळी सर्व वर्गशिक्षकानी आपापल्या वर्गातील विद्यार्थांचे स्वतः उभे राहून शिबिरामध्ये डोळे तपासणी करून घेतले ह्या शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना पाहताना किंवा वाचतांना डोळ्यांचा दोष आहे असे ७ ते ८ विद्यार्थ्यांना "के. बी. हाजी बच्चूअली धर्मादाय डोळ्यांचे हॉस्पिटल"येथे यांच्यावर मोफत उपचार केले जातील**यावेळी पूजा कांबळे (को ऑर्डिनर),शिल्पा कदम (आरोग्य सेवक ),तन्मय (आरोग्य सेवक),मयुरी पांचाळ (नेत्र तज्ञ),स्नेहल तांबीत (नेत्र तज्ञ)योगेश गवळी (स्पेक्टेकल)या सर्व डॉक्टरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी पूजा कांबळे मॅडम यांनी शिक्षकांनी चष्मे लागणाऱ्या मुलाना काय करावे व काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केले तसेच फलक लेखन राजकर सर व सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले. चव्हाण सर ,राऊत मॅडम ,गायकवाड सर,जाधव सर यांच्या नियोजनानुसार मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीराचे यशस्वी समारोप करण्यात आले .*


Comments
Post a Comment