*श्री साई विद्यालयात नशा मुक्ती शिबिर संपन्न*
आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी श्री साई विद्यालयामध्ये "जनजागृती विद्यार्थी संघ" व "क्राय" (चाइल्ड राइट्स अँड यू) या संस्थेअंतर्गत प्रोग्रॅम फोकस ऑन एज्युकेशन अँड डेडिकेशन चॅलेंजेस इन स्लम मुंबई या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "नशा मुक्ती" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजन केले होते. तंबाखू, गांजा,ड्रग्स इत्यादी अमली पदार्थाचे सेवन न करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले, त्याचबरोबर आपल्या आसपास अशा घटना घडत असतील तर त्या आपल्या पालकांना किंवा शिक्षकांच्या लक्षात आणून द्याव्यात. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणी सोबतच्या संगती बरोबर वाहवत न जाता आपण एखाद्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणायला शिकले पाहिजे. अमली पदार्थाचे सेवन व त्याचे दुष्परिणाम यावर आधारित पीपीटी मुलांना उदाहरणासह पटवून दिली, त्याचबरोबर श्रावणी चव्हाण व उजाला जयस्वार या विद्यार्थिनी ने एका छोट्याशा नाटिकेत भाग घेऊन अमली पदार्थाचे सेवन करू नये याबद्दल उद्बोधित केले या कार्यक्रमास चव्हाण सर व जाधव सर उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व मार्गदर्शक व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नॅक्स देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





Comments
Post a Comment