श्री साई विद्यालयात काव्यगीतातून गुरु विषयी कृतज्ञता.

श्री साई विद्यालयात काव्यगीतातून गुरु विषयी कृतज्ञता.

  

गुरुपौर्णिमेनिमित्त गिरीश एज्युकेशनल ट्रस्ट संचलित श्री साई विद्यालय मानखुर्द मधील आठवीच्या विद्यार्थ्यांनी काव्याद्वारे गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

     मानवी जीवनातील गुरूंचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगल बनसोडे व गायत्री गायकवाड यांच्या“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा” या गीताने सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात गुरुवर आधारित गीतांचे व मनोगतांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडिलांविषयी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी संजना जाधव,प्रेरणा केंजळे, आयुक्ता कांबळे, वेदिका मांइगडे यांनी “आई माझी मायेचा सागर” हे गीत सादर केले तसेच वर्षा पांढरे,तनिष्का खांडेकर, वैष्णवी हुलगे, रेणुका जाधव ,उज्वल यादव यांनीही गीतातून गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त केली मंगल बनसोडे, गायत्री गायकवाड व गणेश शेळके या विद्यार्थ्यांनी मनोगतातुन गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

       संजय जाधव सर यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी केलेल्या संस्कारामुळे माणूस घडतो. विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच वाटा शिक्षकांचा देखील  असल्याचे सांगितले. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुचा आदर करा असे आव्हान देखील यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आयुष्यात अत्युच्च यश मिळवायचे असेल तर शिस्तीशिवाय पर्याय नाही याचाही नामोउल्लेख यावेळी जाधव सर यांनी भाषणात केला. कार्यक्रमाच्या शेवटी वर्ग प्रतिनिधी यांनी आभार मानून पसायदानातून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.                                                

धन्यवाद!!!!

 

Comments