काहीजण पडले,काही जिंकले......शालेय विध्यार्थी लोकशाही समजण्यासाठी लढले श्री साई विद्यालयात

 




काहीजण पडले,काही जिंकले......शालेय विध्यार्थी लोकशाही समजण्यासाठी लढले 

 विद्यार्थ्यांचा जोरदार प्रचार: मतदान केंद्र, कागदाचे बॅनर 




श्री साई विद्यालयामध्ये शालेय निवडणूक जल्लोषात

मुंबई: गिरीश एज्युकेशनल ट्रस्ट संचलित श्री साई विद्यालयामध्ये निवडणूक मतदान केंद्र उभारून इयत्ता आठवीच्या वर्गाचे निवडणुकीचे आयोजन केले होते याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. विद्यार्थ्यांनी कागदी बॅनर द्वारे व भाषण करून जोरदार प्रचार करून  निवडणूक प्रक्रिया जल्लोषात पार पडली

       शाळेतच मुलांचा बौद्धिक विकास व्हावा व त्यांना सामाजिक ज्ञान मिळावे म्हणून श्री साई विद्यालयात मतदानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेण्यात आली. या प्रक्रियेत वर्गातील चार गटातील विद्यार्थ्यांनी पॅनल करून उमेदवारी अर्ज सादर केले सर्व उमेदवारांनी आपापला प्रचार दोन दिवसात पूर्ण करून प्रत्यक्षात शनिवारी 12 जुलै 2025 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर मतदान अधिकारी म्हणून रेणुका जाधव व यश इंगळे यांनी कामकाज पाहिले. शेवटी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मतपेटी उघडून त्यातील मतदानाची मोजणी करण्यात आली त्यामध्ये पवन कांबळे हा विद्यार्थी वर्ग मंत्री म्हणून निवडून आला’त्याचरोबर समर्थ कापसे,शंभुराज चव्हाण,गणेश शेळके,प्रेरणा केंजळे हेही निवडून आले.

        शाळेतील मुलांना लोकशाही व निवडणुकीची प्रक्रिया याची प्रत्यक्ष माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपकरणात उपक्रमातून मुलांमध्ये नेतृत्व विषयी गुणवत्ता वाढत आहे ते लोकशाहीचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ बनण्याची प्रेरणा घेऊ शकतात असे मत यावेळी जाधव सर यांनी व्यक्त केली.

       निवडून आलेल्या विध्यार्थानी पुस्तकातील सविधांनाची शपथ घेवून शालेय कामकाजाची सुरुवात केली.


Comments